SSC Result : दहावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींची बाजी तर 12000 शाळांचा निकाल 100 टक्के

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा (SSC Result) निकाल जाहीर केला आहे. यंदा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागला आहे. यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. 97.96 टक्के मुली तर 96.06 टक्के मुलांचा निकाल लागला आहे. मुलांपेक्षा 1.09  टक्के अधिक मुली पुढे आहेत. विशेष म्हणजे यंदा 22,921 शाळांपैकी 12,210 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.  

महाराष्ट्र बोर्डाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेत ही माहिती देण्यात आली. कोरोनाच्या काळानंतर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परिक्षा ऑफलाइन पद्धतीने झाली होती. विद्यार्थी आणि पालक मोठ्या आतुरतेने निकालाची वाट पाहत होते. आता ही प्रतिक्षा संपली असून आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Bajirao Maharaj Bangar : पुण्यातील कीर्तनकर हभप बाजीराव महाराज यांचा अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड

यंदा 16,38, 964 विद्यार्थ्यांनी (SSC Result) दहावीच्या परीक्षेची नोंदणी केली होती. यापैकी 8,89, 506 मुले असून मुलींची 7, 49, 458  एवढी संख्या होती.

ऑनलाइन निकाल कसा पाहाल?

स्टेप 1 : https://marathi.abplive.com/ वर लॉन ऑन करा
स्टेप 2 : दहावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा
स्टेप 3 : तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका
स्टेप 4 : तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा
स्टेप 5 : एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल
स्टेप 6 : निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.