Bajirao Maharaj Bangar : पुण्यातील कीर्तनकर हभप बाजीराव महाराज यांचा अनोखा जागतिक विक्रम

एमपीसी न्यूज : एरव्ही आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळे विक्रम पाहिले असतील. मात्र, पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील (Bajirao Maharaj Bangar) एका कीर्तनकाराने अनोखा रेकॉर्ड केला आहे. या कीर्तनकाराने सलग 12 तास 20 मिनिट कीर्तन करून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. नारायणगाव येथे त्यांनी हा रेकॉर्ड केला आहे. हभप बाजीराव महाराज बांगर असे या प्रसिद्ध कीर्तनकाराचे नाव आहे.
बाजीराव महाराज बांगर हे आंबेगाव तालुक्यातील (Bajirao Maharaj Bangar) पिंपळगाव खडकी या गावचे रहिवासी आहेत. मागील बारा वर्षापासून ते कीर्तन करतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून प्रेरणा घेत त्यांनी बारा तास कीर्तन करण्याचा निश्चय केला होता. आणि हा निश्चय त्यांनी पूर्ण केला.

पुणे जिल्ह्याच्या नारायणगाव येथील मुक्ताई मंगल कार्यालयात 14 जून रोजी त्यांनी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कीर्तनाला प्रारंभ केला. संत तुकाराम महाराजांच्या उपदेशपर अभंग आणि त्यांनी आपल्या कीर्तनाला प्रारंभ केला होता. त्यानंतर सलग बारा तास वीस मिनिटे किर्तन करत त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.