Akurdi News : भारतीय स्टेट बँकेकडून विद्यांगण शाळेस दहा लाखांचे अर्थसहाय्य

एमपीसी न्यूज – ओम प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) सीएसआर उपक्रमांतर्गत विद्यांगण शाळेच्या सुशोभीकरणासाठी व विविध साहित्य घेण्यासाठी 10 लाख रुपयांचे अर्थसहाय्य केले.

ओम प्रतिष्ठान हे नेहमीच निराधार, गरजू व होतकरू मुलांसाठी काम करत असते व एवढेच नव्हे तर त्यांनी आतापर्यंत 14 मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे  तसेच त्यांचा विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये देखील सहभाग असतो. त्यांच्या कार्यांचा गौरव म्हणून भारतीय स्टेट बँकेकडून त्यांना धनादेश सुपूर्द करण्यात आला. भारतीय स्टेट बँक देखील नेहमी अशा संस्थांना हातभार लावत असते हे ह्या गोष्टीतून दिसते.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय स्टेट बँकचे पुणे विभाग प्रमुख व उपमहाव्यवस्थापक जगन्नाथ साहू, पुणे पश्चिम विभागाचे क्षेत्रीय व्यवस्थापक हरे राम सिंग, पुणे विभागीय कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक अविनाश कुमार, पुणे पश्चिम विभागाचे मुख्य व्यवस्थापक मिलिंद नाईक तसेच बँकेच्या चिंचवड शाखेचे प्रमोद ढेंगरे, समीक्षित शेडगे व स्नेहा पांडा, विद्यादान योजनेच्या अध्यक्षा डॉ. सोनल पाटील व सेक्रेटरी विद्या महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

शाळेच्या संचालिका सौ वनिता सावंत यांनी प्रास्ताविक केले. विद्यादान योजनेची लाभार्थी रिमा प्रजापती हिने तिचा अनुभव सांगितला व सहकार्याबद्दल प्रतिष्ठानचे आभार म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीता पाटील यांनी केले.

कार्यक्रमाचे नियोजन पूजा माने, कीर्ती कुलकर्णी, टीना पाटील, पूर्वा सावंत, प्रज्ञा सावंत व ओंकार गोलांडे यांनी केले. त्यांना अनिता पाटील यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.