Chinchwad : अँटी गुंडा स्कॉडच्या कारवाई दरम्यान तडीपार आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – चिंचवड पोलिसांनी अँटी गुंडा स्कॉडच्या कारवाई दरम्यान एका तडीपार गुन्हेगाराला अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 13) चिंचवडमधील हॉटेल रुद्राजवळ केली.

मंगेश सांगळे असे अटक केलेल्या तडीपार आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड पोलीस शनिवारी अँटी गुंडा स्कॉडची कारवाई करीत होते. त्यावेळी चिंचवडमधील हॉटेल रूद्रा शेजारी असलेल्या चहाच्या टपरीवर मंगेश सांगळे हा उभा आहे. मंगेश याला एप्रिल महिन्यात एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे, अशी माहिती चिंचवड पोलिसांना मिळाली. त्यानुसार परिसरात सापळा रचून मंगेशला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याला एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून त्याला अटक करण्यात आली.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, कर्मचारी जगताप, शेलार, माने, भदाणे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.