HSC Result 2022 : सिम्बायोसिस ज्युनियर कॉलेजचे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश

एमपीसी न्यूज – सिम्बायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीचे सिम्बायोसिस ज्युनियर कॉलेज किवळेच्या विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत (इयत्ता बारावी) (HSC Result 2022) घवघवीत यश मिळवले आहे.

कोरोना काळात महाविद्यालयाने वेळोवेळी स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेत बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन, ऑनलाईन मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या सरावात महाविद्यालयाने सातत्य ठेवले. त्यामुळे सर्व विद्यार्थी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत (HSC Result 2022 )उत्तीर्ण झाले. कोरोना साथीच्या काळानंतर ही पहिलीच ऑफलाईन परीक्षा होती.

Mithali Raj Retirement : मिताली राज निवृत्ती; महिला क्रिकेटच्या एका पर्वाचे राज्य समाप्त

यशस्वी विद्यार्थ्यांचे सिम्बायोसिसचे संस्थापक व अध्यक्ष प्रो. डॉ. एस बी मुजुमदार, सिम्बायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीच्या प्रधान संचालिका डॉ. स्वाती मुजुमदार, प्राचार्या भावना नरसिंगोजु, शिक्षक, कर्मचारी यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयाच्या विज्ञान आणि वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के तर कला शाखेचा निकाल 99.15 टक्के लागला आहे. महाविद्यालयातील 94 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, 148 विद्यार्थी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.