Snooker Championship : तहा खान, एमडी अली हसन, पियुष खुशवाह, विश्‍वजीत मोहन, मोहम्मद हुसेन खान यांचा मुख्य फेरीत प्रवेश 

एमपीसी न्यूज – द क्यु क्लबतर्फे आयोजित स्टरलाईट टेक अखिल भारतीय खुली स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेत (Snooker Championship) तहा खान, एमडी अली हसन, पियुष खुशवाह, विश्‍वजीत मोहन, मोहम्मद हुसेन खान यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.

 

वडगांव-शेरी येथील द क्यु क्लबमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत मूळच्या मुंबईच्या तहा खान याने अमरदीप सिंग याचा 69-23, 83-61, 83-31 असा पराभव करून मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश केला. चुरशीच्या झालेल्या सामन्यात मोहम्मद हुसेन खान याने संकेत मुथा याचा 17-54, 67-26, 32-64, 67-37, 59-40 असा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.

 

विश्‍वजीत मोहनने नितीन माने याचा 60-52, 58-61, 43-59, 53-48, 69-15 असा संघर्षपूर्ण पराभव करून मुख्य फेरी गाठली.एमडी अली हसन याने विरेन शर्मा याचा 41-29, 57-36, 39-62, 74-39 असा पराभव करून आगेकूच केली.पियुष खुशवाह याने सुशांत खाडे याचा 75-67, 48-55, 81-22, 68-41 असा पराभव आणि मुख्य फेरीत प्रवेश केला.

मुख्य फेरीमध्ये 32 खेळाडूंनी प्रवेश केला असून यामध्ये शाहाबाज खान, शिवम अरोरा, रफत हबीब, हसन बदामी, कृशेष गुरूबक्शानी, अनुज उप्पल, फैझल खान, सिद्धार्थ पारेख असे राष्ट्रीय मानांकित खेळाडू झुंझणार आहेत. या 32 खेळाडूंचे 4-4 जणांचे 6 गट तयार करण्यात आले असून त्यांच्यामध्ये साखळी सामने खेळवण्यात येणार असून त्यानंतर बाद फेरीचे सामने होणार आहेत.

स्पर्धेचा निकालः पात्रता फेरीः

 

पियुष खुशवाह वि.वि. सुशांत खाडे 75-67, 48-55, 81-22, 68-41;

शोएब खान वि.वि. गौरव जयसिंघे  75-37, 73-07, 71-30;

अलेक्स रेगो वि.वि. कुणाल सौंगर 55-28, 49-46, 67-60;

तहा खान वि.वि. अमरदीप सिंग 69-23, 83-61,83-31;

मोहम्मद हुसेन खान वि.वि. संकेत मुथा 17-54, 67-26, 32-64, 67-37, 59-40;

शब्बीर शेख वि.वि. अझिम हसन 57-45, 40-59, 50-34, 44-78,67-13;

विश्‍वजीत मोहन वि.वि. नितीन माने 60-52, 58-61, 43-59, 53-48, 69-15;

एमडी अली हसन वि.वि. विरेन शर्मा 41-29, 57-36, 39-62, 74-39;

अभिजीत मोरे वि.वि. चिंतामणी जाधव 70-60, 67-30, 62-42;

रोहन साकळकर वि.वि. आर. व्हि. साईकृष्णन 38-68, 49-41, 66-48, 56-45;

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.