Talegaon Dabhade News : तळेगाव दाभाडे शहर भाजपा कामगार आघाडी अध्यक्षपदी अशोक दाभाडे यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज : भारतीय जनता पक्ष-तळेगाव दाभाडे शहर कामगार आघाडी अध्यक्षपदी अशोक दादाभाऊ दाभाडे यांची नियुक्ती करण्यात आली. तसे दाभाडे यांना नियुक्तीपत्र  माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे आणि जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली  भाजपा पुणे जिल्हा कामगार आघाडी अध्यक्ष जयेश शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. 

यावेळी तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे, शहराध्यक्ष रविंद्र माने, माजी उपसभापती शांताराम कदम, जि.प.सदस्य नितीन मराठे, अलका धानिवले,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संदिप काकडे, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सायली बोत्रे,संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक शामराव राक्षे, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष अमोल भेगडे, नितीन घोटकुले, तालुका सरचिटणीस  सुनिल चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आले.

दाभाडे हे स्व.पै. विश्वनाथराव भेगडे माथाडी कामगार संघटनेत सुप्रिम कंपनी युनियन अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत, यापूर्वी सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली असून  सरसेनापती उमाबाई दाभाडे मंडळाचे माजी अध्यक्ष यांसह अनेक संस्था संघटनांच्या माध्यमातून मावळ तालुक्यात सुपरिचित आहेत. त्यांच्या निवडीचे कामगार क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.