एमपीसी न्यूज – इंदोरी येथील चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) मध्ये पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या आरोही रोहित चाफेकर या विद्यार्थिनीने राज्यस्तरीय “अँमँट्यूर सवाते” कराटे स्पर्धेत (karate competition) सुवर्णपदक मिळवले. याबद्दल शाळेच्यावतीने तिचा सत्कार करण्यात आला. ही स्पर्धा 19 जून रोजी वडगाव धायरी येथे झाली.
यानिमित्त शाळेच्यावतीने कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास आरोहीचे वडील रोहित चाफेकर व आई प्रतीक्षा चाफेकर आणि संस्थेच्या व्यवस्थापन समितीतील सभासद, शाळेच्या मुख्याध्यापिका, अध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
Pune Crime News : एसीबीचे अधिकारी असल्याचे भासवून अधिकाऱ्याच्या घरात शिरले, पण…
मुख्याध्यापिका हेमलता खेडकर यांनी आरोहीचे पुष्प देऊन कौतुक केले व तिच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच आरोहीच्या पालकांचा भगवद्गीता देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आरोहीच्या पालकांनी शाळेने आयोजित केलेल्या कौतूक सोहळ्याबद्दल शाळेचे संस्थापक, मुख्याध्यापिका व अध्यापक वृंद यांच्याप्रती आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आयोजन व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापिका, अध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते.