Talegaon News: रक्तदान शिबिराला प्रतिसाद; 62 जणांनी केले रक्तदान

ससून रुग्णालय रक्तपेढीमार्फत 62 युनिट रक्त संकलित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे रवींद्र भेगडे यांच्या हस्ते झाले.

एमपीसी न्यूज – संत निरंकारी मिशनतर्फे आयोजित आपत्कालीन रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. 62 जणांनी रक्तदान केले.

संत निरंकारी सत्संग भवन, तळेगाव दाभाडे येथे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.30) आपत्कालीन रक्तदान शिबिर पार पडले. ससून रुग्णालय रक्तपेढीमार्फत 62 युनिट रक्त संकलित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे रवींद्र भेगडे यांच्या हस्ते झाले.

ससून रुग्णालय रक्तपेढी, कमांड हॉस्पिटल रक्तपेढी, औंध रुग्णालय रक्तपेढी यांच्या विनंतीनुसार अशा प्रकारचे रक्तदान शिबिर पुणे जिल्ह्यात झोन प्रभारी ताराचंद करमचंदानी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत.

कोरोना विषाणूने महाराष्ट्रात थैमान घातल्यामुळे राज्यातील सर्वच शासकीय यंत्रणा हैराण झाल्या असून याचा प्रभाव आरोग्य यंत्रणेवर देखील पडला आहे. ससून रुग्णालय रक्तपेढी, कमांड हॉस्पिटल रक्तपेढी, औंध रुग्णालय रक्तपेढी यांच्या आवश्यकतेनुसार रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

रक्तदान शिबिरात प्रशासन-डॉक्टरांनी दिलेल्या सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यात आले तसेच फिजिकल डिस्टन्सिंगकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. याच प्रकारचे रक्तदान शिबीर प्रत्येक महिन्याला पुणे जिल्ह्याच्या विविध भागामध्ये निरंकारी मिशन तर्फे आयोजित करण्यात येत आहेत अशी माहिती मंडळातर्फे देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.