Talegaon : कॉलेजला जाणाऱ्या तरुणीची छेड काढणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – कॉलेजला जाणाऱ्या तरुणीचा पाठलाग करत (Talegaon)तिची छेड काढणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही घटना 5 ते 8 जानेवारी दरम्यान तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी कॉलेज रस्त्यावर घडली.

पिडीत तरुणीने या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दस्तगिर साहेबखान पठाण (वय 24, रा. रहाटणी) याला अटक करण्यात आली आहे.

 

PCMC : महापालिका नव्याने रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना देणार धडे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी कॉलेजला (Talegaon)जात असताना आरोपी त्या तरुणीचा पाठलाग करत असे. तसेच फिर्यादी रस्त्याने जाताना आरोपीने त्यांचा हात पकडत त्यांच्याशी गैरवर्तन केले.

‘तू कोठेही गेली तरी तुला सोडणार नाही, तुला पाहून घेतो, अशी धमकी आरोपीने दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.