Pune News : शिरूरमध्ये जीवघेणा हल्ला झालेल्या ‘त्या’ महिलेची प्रकृती स्थिर

पण दोन्ही डोळ्यांची दृष्टी कायमची गेली

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील न्हावरे गावात शौचासाठी गेलेल्या महिलेव अज्ञात आरोपीने विनयभंग करण्याचा प्रयत्न करत जीवघेणा हल्ला केला होता. यामध्ये महिलेच्या दोन्ही डोळ्याला जबर दुखापत झाली होती. सध्या महिलेवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी डोळ्याचे ऑपरेशन केले असून या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु इथून पुढे ही महिला दोन्ही डोळ्यांनी पाहू शकणार नाही. 

या महिलेच्या पतीला विचारले असता त्यांनी सांगितले,  मंगळवारी रात्री माझी पत्नी जवळच असणाऱ्या मुलीच्या घरी गेली होती. तेथून ती नैसर्गिक विधीसाठी बाहेर गेली होती. काही वेळाने आम्हाला एकाने फोन करून त्या तिथे पडल्याचे सांगितले. आम्ही जवळ जाऊन पाहिले असता संपुर्ण रक्ताने तिचा चेहरा रक्ताने माखला होता.

पीडित महिलेने पतीला सांगितल्यानुसार, पीडित महिला शौचासाठी बाहेर गेल्यानंतर पाठीमागून आलेल्या एका व्यक्तीने तिचा गळा दाबला. त्यानंतर तिचे डोके एका दगडावर आपटले. यामध्ये एका डोळ्याला इजा झाल्यानंतर आरोपीने खिशातून अणुकुचीदार वस्तू काढली आणि दुसऱ्या डोळ्यावर मारले आणि पळ काढला.

ग्रामीण पोलिसांनी या संपूर्ण घटनेची गंभीर दखल घेतली आहे. पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.