Pimpri News : दुचाकी हळू चालविण्यास सांगितल्याने कार चालकाला विटांनी मारहाण

एमपीसी न्यूज – रॅश ड्राईव्हिंग करू नको, गाडी हळू चालव, असे सांगितल्याच्या कारणावरून दोन जणांनी मिळून एका कार चालकाला विटांनी मारहाण केली. ही घटना पिंपरी येथे शनिवारी (दि. 23) रात्री घडली.

अक्षय परदेशी (वय 23), बॉक्‍सर ऊर्फ कृष्णा पारधे (वय 24, दोघेही रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. राहूल अर्जुनदास मेलवानी (वय 29, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास फिर्यादी हे आपल्या कारमधून जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना वेडी-वाकडी वळणे घेत ओव्हरटेक केले. त्यावेळी मेलवानी यांनी दुचाकीस्वाराला ‘गाडी हळू चालव’ असे सांगितले. या कारणावरून चिडलेल्या आरोपींनी मेलवानी यांच्या कारला दुचाकी आडवी लावली. आरोपींनी फिर्यादी मेलवानी यांना शिवीगाळ करीत विटांनी मारहाण करून जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.