Pune News : बायकोचे ‘बाहेर काही तरी चालू असल्याच्या’ संशयातून नवऱ्याने पेटवून दिले

एमपीसी न्यूज : ‘तुझे बाहेर कोठेतरी काही तरी चालू आहे’ असे बोलून संशय घेत नवऱ्याने विवाहितेला पेटवून देत खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना एसएसपीएम कॉलेज शेजारील सर्वंट क्वाटरमध्ये 10 फेब्रुवारी रोजी घटना. याप्रकरणी सुरेखा दत्ता कसबे (वय 30) यांनी फिर्याद दिली असून पती दत्ता सुरेश खुजवे त्याच्या विरोधात बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी पती-पत्नी आहेत. पती दत्ता कुसबे हा पत्नीवर नेहमी संशय घ्यायचा. ” तुझे बाहेर कुठेतरी काहीतरी चालू आहे” असे सारखा बोलायचा. पतीच्या या संशयीवृत्तीला कंटाळून फिर्यादीने घरातील काचेच्या बाटलीतील रॉकेल अंगावर ओतून घेतले.

तर त्याचवेळी आरोपीने माचीसची काडी पेटवून फिर्यादीचे अंगावर टाकून दिली. यामध्ये फिर्यादी या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी पती वर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून बंडगार्डन पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.