Dapodi News :लग्नाच्या आमिषाने तरुणीला पळवून खून!, नातेवाईकांचा आरोप

खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा नातेवाईकांचा संशय

एमपीसी न्यूज – लग्नाच्या आमिषाने 18 वर्षीय तरुणीला दापोडी येथून उत्तर प्रदेशला पळवून नेले. त्यानंतर तिचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावली अथवा तिला विकले असल्याचा तरुणीच्या नातेवाईकांना संशय आहे. याबाबत अपहरण, खून, पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरविंद बरार (वय 30), मनीष (वय 25), ठकुरी (वय 55, तिघे रा. मुसमरिया, जि. जालौन, उत्तर प्रदेश), साधना उमेश निवासनी (रा. दापोडी मिल्ट्री छावणी, पुणे. मूळ रा. गडेरना, जि. जालौन, उत्तर प्रदेश), कनछीदना पिंटू निवासनी (रा. दापोडी मिल्ट्री छावणी, पुणे. मूळ रा. क्योलारी, जि. जालौन, उत्तर प्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत सहाबसिंह पंचमसिंह बरार (वय 47, रा. मडोरा, जि. झांसी, उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. उर्मिला सहाबसिंह बरार (वय 18) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी दापोडी येथील मिल्ट्री छावणीत राहत होती. त्याच वेळी आरोपी साधना आणि कनछीदना या दोघी देखील तिथेच राहत होत्या. आरोपी अरविंद याने फिर्यादी यांच्या मुलीला तिच्यासोबत विवाह करण्याचे आमिष दाखवले. त्या आमिषापोटी त्याने मुलीला उत्तर प्रदेश येथे पळवून नेले. हा प्रकार 26 जानेवारी 2017 रोजी सीएमई (कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग) दापोडी येथे घडला.

पळवून नेल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलीचा अज्ञात कारणावरून खून केला. तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली अथवा तिला कोणत्यातरी व्यक्तीला विकले असा फिर्यादी यांना संशय आहे. याबाबत त्यांनी उत्तर प्रदेश मधील जालौन जिल्ह्यातील चुर्खी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. याबाबत पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 366, 302, 201, 506 नुसार गुन्हा नोंद केला.

हा प्रकार भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दापोडी येथे घडल्याने हा गुन्हा भोसरी पोलिसांकडे वर्ग केला आहे. दरम्यान फिर्यादी त्यांच्या गावी गेले असल्याने गुन्हा दाखल करण्यात विलंब झाला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.