Weather Update : येत्या 2 जून पर्यंत मान्सून तळ कोकणात दाखल होणार 

एमपीसी न्यूज : यंदा तीव्र उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. यावेळी मान्सून अंदमानाच्या समुद्रात मोसमी पाऊस (र्नैऋत्य मोसमी वारे) सोमवारीच दाखल झाला आहे. येत्या 2 जूनपर्यंत तळकोकणात येईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

सर्वसाधारणपणे यावेळी मोसमी पाऊस पाच ते सहा दिवस आधीच अंदमानात दाखल झाला आहे. याचाच र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग पाहता ते तळकोकणात 8 ते 10 जून ऐवजी 2 ते 3 जूनला येण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

र्नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनामुळे वाऱ्यांचा वेग वाढला असून मध्य भारतातील कमाल आणि किमान तापमान तीन ते चार अंशांनी घटणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या 24 तासात मराठवाड्यासह विदर्भात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.

19, 20 मे ला जोरदार पावसाची शक्यता

हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 18, 19 आणि 20 मे रोजी विजांच्या कडकडाटाबरोबरच जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. सध्या राज्यात ढगाळ आणि कोरडे वातावरण आहे. 19 आणि 20 मे दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.