National Hockey Competition – राष्ट्रीय हॉकी स्पर्धा आजपासून, बाद फेरीचे सामने होणार प्रकाश झोतात

एमपीसी न्यूज – टोकियो ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेत्या भारतीय संघातील सदस्य रुपींदर पाल सिंग आणि कुमार विश्वकरंडक संघातील खेळाडू अभिषेक लाक्रा यांचा खेळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेच्या निमित्ताने पहायला मिळणार आहे.

या स्पर्धेला आज शनिवारपासून (दि. 11) पिंपरी – चिंचवड येथे सुरू होणार आहेत. स्पर्धेतील सर्व सामने नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद मैदानावर होणार असून, संयोजकांनी प्रेक्षकांसाठी बाद फेरीपासूनचे सामने प्रकाशझोतात खेळविण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतातील अनुभवी खेळाडू या स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावणार असून, यात रुपिंदरपाल हा हॉकी पंजाबकडून खेळेल. आपल्या ड्रॅग फ्लिक कौशल्याने त्याने आपली छाप टोकियोत पाडली आहे. उदयोन्मुख बचावपटू म्हणून लौकिक मिळविणारा अभिषेक ओडिशाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. या स्पर्धेत त्याच्या कामगिरीकेड निश्चितपणे नजरा लागून राहणार आहेत.

स्पर्धेसाठी नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद स्टेडियम सज्ज झाले असून, स्पर्धेत 29 संघ खेळणार आहेत. अंदमान आणि निकोबार संघाने स्पर्धेतून माघार घेतल्याचे संयोजन सचिव मनोज भोर यांनी सांगितले. त्यांच्या माघारीमुळे आता ड गटात केवळ तीनच संघ राहणार असून, पंजाब, आंध्र प्रदेश आणि उत्तराखंड यांच्यात गटविजेतेपदासाठी चुरस राहिल.

या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक माजी ऑलिंपियन येथे एकत्र आले आहेत. 1996 चे ऑलिंपियन संजीव कुार आणि बलविंदर हे अनुक्रमे पंजाब संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक म्हणून आले आहेत. अन्य प्रमुख खेळाडूंमध्ये विश्वकरंडक स्पर्धेसाठी संभाव्य संघात स्थान मिळविलेला एम. धनचंद्रा सिंग मणिपूरकडून खेळणार आहे. महंमद अमिर या आमखी एका खेळाडूकडे लक्ष राहणार आहे.

दोन वर्षांनी राष्ट्रीय स्पर्धा होत असल्यामुळे सर्व संघ स्पर्धेची उत्सुकतेने वाट बघत आहेत. खेळाडूंप्रमाणे हॉकी चाहते आणि क्रीडा प्रेमी देखील या स्पर्धेसाठी आतूर आहेत. त्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी बाद फेरीचे सामने प्रकाश झोतात खेळविण्यात येतील. महाराष्ट्रात तिसऱ्यांदा वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे आयोजन होत आहे. आघाडीच्या फळीतील तालेब शाह महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे.

पहिल्या दिवशी सहा सामने होणार असून, पहिला सामना सकाळी 7.00 वाजता होईल.

उद्याचे सामने –

क गट – हॉकी कर्नाटक वि. हॉकी जम्म-काश्मिर (सकाळी 7 वा.), पु्ड्डुचेरी वि. हॉकी अरुणाचल प्रदेश (सकाळी 8.30 वा.), ड गट – लहॉकी पंजाब वि. हॉकी उत्तराखंड (सकाळी 10 वा.), हॉकी आंध्र प्रदेश वि. हॉकी अंदमान-निकोबार (दु. 11.30 वा.), ई गट – हॉकी चंडिगड वि. हॉकी राजस्थान (दु. 1 वा.), हॉकी मणिपूर वि. हॉकी त्रिपुरा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.