Vegetable Sale at Grocery Shop : लवकरच रेशन दुकानात सुरू होणार फळे, भाजीपाला विक्री?

मुंबई आणि पुणे येथे राबवणार प्रायोगिक तत्त्वावर योजना

एमपीसी न्यूज – एकाचवेळी रेशन आणि भाजी खरेदीसाठी जाणे बऱ्याचदा ग्राहकांसाठी कसरतीचे ठरते, वेळही जातो, पण भाजी, फळे रेशन दुकानांमध्येच (Vegetable Sale at Grocery Shop) खरेदी करता आली तर? राज्य सरकारकडून लवकरच ही योजना राबवण्यात येणार आहे. तत्पूर्वी पुण्यानंतर आता मुंबई आणि ठाणे येथे या योजनेची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दरम्यान रेशन दुकानांचे उत्पन्न वाढावे यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे शासनाकडून सांगण्यात येत आहे. 

रेशन दुकानांवर भाजी, फळे विक्रीसाठी उपलब्ध (Vegetable Sale at Grocery Shop) करण्याबाबतची ही योजना प्रायोगिक तत्त्वावर पहिल्यांदा पुण्यात राबवण्यात आली होती. हीच सुविधा आता मुंबई आणि ठाणेकरांसाठी उपलब्ध होणार असून तिथे सुद्धा हीच योजना राबवण्यात येणार आहे. या संपुर्ण प्रक्रियेत अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून शेतकरी उत्पादक कंपन्यांना रेशन दुकानांमध्ये भाजी, फळे विक्रीसाठी परवानगी मिळाली आहे.

HSC Result 2022 : बारावीचा आज निकाल होणार जाहीर; विद्यार्थी, पालकांची उत्सुकता शिगेला

या प्रक्रियेत शेतकऱ्यांना केवळ परवानगी मिळाली नसून त्यामध्ये काही अटींची सुद्धा तरतूद करण्यात आली आहे, त्यामुळे कंपन्यांना या अटींचे पालन सुद्धा करावे लागणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून परवानगी मिळालेल्या कंपन्यांपैकी ‘पुण्याच्या शाश्वत कृषी विकास’ आणि नाशिकच्या ‘फार्म फिस्ट फार्मर्स प्रोड्यूसर’ या दोन कंपन्यांचा समावेश आहे. दरम्यान, रेशन दुकानांचे उत्पन्न वाढावे यासाठी हा प्रयत्न असल्याचे शासनाने यावेळी स्पष्ट केले आहे.

पुण्याप्रमाणेच मुंबई आणि ठाणे येथे हा प्रयोग यशस्वी झाला तर लवकरच रेशन दुकानांमध्ये भाजी आणि फळे (Vegetable Sale at Grocery Shop) मिळण्यास सुरू होईल असे सांगण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.