Crime News : चाकण येथे साडेचार लाखाच्या ट्रॅक्टर व ट्रॉलीची चोरी

एमपीसी न्यूज – चाकण येथील कडाचीवाडीमधील देवेंद्र पार्क येथून 4.5 लाख रुपये किंमतीचे ट्रॅक्टर व ट्रॉली अज्ञात चोरट्याने मंगळवारी रात्री चोरून नेली.

याबाबत संभाजी कड, (वय 62, रा.कडाचीवाडी चाकण) यांनी फिर्याद दिली आहे.अज्ञात चोरट्याविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News : पोलिसात तक्रार दिल्यामुळे नातेवाईकांनी पती-पत्नीसह सुनांना केली शिवीगाळ व मारहाण

फिर्यादीचा 4 लाख रुपये किमतीचा फोर्स कंपनीचा बलवान ट्रॅक्टर हा 50 हजार रुपये किंमतीच्या डम्पिंग ट्रॉलीसह देवेंद्र पार्क, कदाचिवाडी येथे पार्क केले असताना मंगळवारी संध्याकाळी 7 वा ते बुधवारी, 17 ऑगस्ट सकाळी 5.45 वा दरम्यान चोरट्याने चोरी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.