Thergaon News: पत्नीला नांदायला पाठवत नसल्याने सास-याला मारहाण; जवयावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पत्नीला नांदायला पाठवत नसल्याने जावयाने सास-याला विटेने मारहाण केली. ही घटना 22 डिसेंबर रोजी मध्यरात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास थेरगाव येथे घडली.

संजय जनार्धन जाधव (वय 25, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या जावयाचे नाव आहे. याप्रकरणी संतोष विश्वनाथ कांबळे (वय 45, रा. काळेवाडी फाटा, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्यांचे जावई संजय जाधव 22 डिसेंबर रोजी मध्यरात्री पावणे दोन वाजता फिर्यादी काम करत असलेल्या थेरगाव येथील सोसायटीत आले. फिर्यादी त्यांच्या मुलीला आरोपी सोबत नांदायला पाठवत नाहीत, या रागातून जावयाने फिर्यादी यांना सिमेंटच्या विटेच्या तुकड्याने डोक्यात व पायाला मारून दुखापत केली. त्यानंतर शिवीगाळ केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.