Pune : रिक्षाचा टायर व बॅटरी चोरणारा अट्टल चोर जेरबंद

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील रिक्षांच्या बॅटरी (Pune) व टायर चोरणाऱ्या अट्टल चोराला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे.  त्याच्याकडून पोलिसांनी पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत.

शादाब युसुफ अन्सारी (वय 22 रा.हडपसर)  असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी रिक्षाच्या बाजूला रिक्षा लावून चोरी करत असल्याची व रिक्षाला ब्रेक मारला असता फ्लॅश लाईट लागत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस परिसरात सलग पाच दिवस मागे फ्लॅशलाईट असलेली रिक्षा शोधत होते. पोलिसांनी मंगळवारी (दि.11) सापळा रचून आरोपीचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याची रिक्षा तपासली असता त्यामध्ये पोलिसांनी 8 रिक्षाचे टायर,2 बॅटरी मिळून आले.

Chinchwad : क्रांतिवीर चापेकर बंधुंच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम

आरोपीकडे तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.(Pune) आरोपीकडून पोलिसांनी 25 रिक्षाची स्टेफनी (टायर), दोन बॅटरी व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण 2 लाख 58 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपी वरील समर्थ पोलीस ठाणे येथील तीन, हडपसर पोलीस ठाणे येथील 1, वानवडी पोलीस ठाण्यातील एक असे एकूण पाच गुन्हे पोलिसांनी उघड केले आहेत.

आरोपी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.त्याच्यावर 6 चोरीचे गुन्हे देखील दाखल आहेत. तो भाडे तत्वावर रिक्षा चालवत होता. (Pune) रिक्षाच्या बाजूला रिक्षा उभी करून रिक्षाचे टार किंवा बॅटरी चोरायचा.या गुन्ह्याचा पुढील तपास समर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.