Pune News : यंदा मनसेचा वर्धापन दिन पुण्यात, 7 मार्चपासून राज ठाकरे पुणे दौऱ्यावर

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन सोहळा 9 मार्चला असतो. हा दिवस दरवर्षी मनसेकडून मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. मात्र दर वर्षी मुंबईत साजरा केला जाणारा मनसेचा वर्धापन दिन यंदा पुण्यात साजरा केला जाणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच मुंबई बाहेर वर्धापन दिन सोहळा होणार आहे. 7 ते 10 मार्च या कालावधीत राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात ते मनसेचे कार्यक्रम, मनसेचा वर्धापन दिन आणि पिंपरी-चिंचवड दौरा या कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. 

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आले आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही यासाठी जोरदार तयारी केली असून पुणे महापालिकेच्या निवडणुकीत स्वतः राज ठाकरे यांनी लक्ष घातले. त्यामुळे तिच्या सात मार्चपासून राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येणार आहेत.

आपल्या पुणे दौर्‍यात राज ठाकरे पक्षाच्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. 9 मार्चला मनसेचा वर्धापन दिन सोहळा असतो. हा सोहळा यंदा पुण्यातच होणार असल्यामुळे राज ठाकरे या सोहळ्यात मार्गदर्शन करतील. तर 10 मार्चला राज ठाकरे पिंपरी चिंचवड चा दौरा करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.