India Corona Update : चोवीस तासांत 5,921 नवे कोरोना बाधित, 11,651 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशभरात 5 हजार 921 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 11 हजार 651 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पॉझिटिव्हिटी रेट देखील 0.63 टक्के एवढा खाली आला आहे. 

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 4 कोटी 29 लाख 57 हजार 477 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 4 कोटी 23 लाख 78 हजार 721 रूग्ण बरे झाले आहेत. देशात सध्या 63,878 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.65 टक्के एवढा झाला आहे.

गेल्या 24 तासांत 289 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर 5 लाख 14 हजार 878 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा मृत्यूदर 1.18 टक्के एवढा झाला आहे.

ICMR च्या आकडेवारी नुसार देशात आजवर 77.19 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 9.40 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आजवर 178 कोटी 55 लाख 66 हजार 940 जणांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.