23.2 C
Pune
शुक्रवार, ऑगस्ट 12, 2022

Todays Horoscope 26 June 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

spot_img
spot_img

आजचे पंचांग – वार – रविवार, दि. 26.06.2022 (Todays Horoscope 26 June 2022)

  • शुभाशुभ विचार – त्रयोदशी दिन.
  • आज विशेष – प्रदोष.
  • राहू काळ – सायंकाळी 04.30 ते 06.00.
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – कृत्तिका 13.06 पर्यंत नंतर रोहिणी.
  • चंद्र राशी – वृषभ.

________________________

आजचे राशीभविष्य (Todays Horoscope 26 June 2022)

मेष – (शुभ रंग- पांढरा)

आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. आपल्या आवडत्या क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळू शकेल. अनपेक्षित लाभ कामातील उत्साह वाढवतील. वक्ते व्यासपीठ गाजवतील.

वृषभ – (शुभ रंग- आकाशी)

आज तुम्ही फक्त स्वतःच्या प्रेमात असाल. वादविवादात आपल्या मतावर ठाम राहाल. कुटुंबात आर्थिक सुबत्ता नांदेल. तुमचा उत्साह व कार्यक्षमता ही चांगली असेल.

मिथुन – (शुभ रंग- मोरपंखी)

तुमची मोठ्या लोकांमधील उठबस फायदेशीर राहील. काही अती आवश्यक खर्च हात जोडून उभे असतील. जमाखर्चाचा मेळ घालणे जरा अवघड जाईल. लहरीपणास आवर घाला.

कर्क – (शुभ रंग- पिस्ता)

व्यवसायात आर्थिक उलाढाल वाढेल. कार्यक्षेत्रात नवी आव्हाने स्वीकाराल. स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. वैवाहिक जीवन सौख्य पूर्ण राहील.

सिंह – (शुभारंभ- डाळिंबी)

वादविवादात आज तुम्ही स्वतःचेच घोडे पुढे दामटवाल. हाताखालच्या मंडळींना तुमचे दडपण जाणवेल. आज आर्थिक व्यवहारात मात्र सावध राहणे गरजेचे आहे.

कन्या – (शुभ रंग- सोनेरी)

क्षुल्लक कामातही अडचणींचा सामना करावा लागेल. कार्यक्षेत्रात वाढत्या स्पर्धेमुळे थोडेफार नैराश्य जाणवेल. विद्यार्थी आज अभ्यासात चालढकल करणार आहेत.

Vikram Gokhale : पत्रकारिता समाजाधिष्ठीत असावी : विक्रम गोखले;ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख यांचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात

तूळ – (शुभ रंग – चंदेरी)

आज तुम्ही जे काही कराल ते तब्येतीला जपूनच करा विवाह जुळवण्याविषयी चर्चा आज नकोतच. अंगमेहनतीची कामं करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षिततेस प्रथम प्राधान्य द्यावे.

वृश्चिक – (शुभ रंग -केशरी)

आज तुम्ही व्यवसायातील वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. अडचणीच्या प्रसंगी पत्नीची साथ मोलाची राहील. पारिवारिक सदस्यांमध्ये सलोखा राहील.

धनु – (शुभ रंग- सोनेरी)

ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. अहो सर सलामत तो पगडी पचास हे लक्षात ठेवा. काही येणी असतील तर न मागता वसूल होतील.

मकर – (शुभ – रंभ क्रीम)

घरात आधुनिक सुखसोयी साठी खर्च कराल. कार्यक्षेत्रात तुम्हाला पूर्वी केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. कलाकारांची लोकप्रियता वाढेल. आनंदी दिवस.

कुंभ – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस. ज्येष्ठ मंडळींना प्रकृती उत्तम साथ देईल.

मीन – ( शुभ रंग- मरून)

दैनंदिन कामात काही अडचणींना तोंड द्यावे लागेल. मुलांना अभ्यास सोडून आज सर्व काही सुचेल. टेलिफोन बिल भरावे लागणार आहे. शेजाऱ्यांशी आज गोडी गुलाबी राहील.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी.
फोन – 9689165424

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

spot_img
Latest news
Related news