Bhosari Crime News : गांजा ओढणाऱ्या दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढणा-या दोघांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 20) दुपारी दीड वाजताच्या सुमारास अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या भिंतीजवळ, भोसरी येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली.

शाबीर बहादूर शेख (वय 22, रा. देवकर वस्ती, भोसरी ), जळवा मुंजाजी चिलगर (वय 29, रा. नाना गवळी चाळ, भोसरी. मूळ रा. परभणी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांना समजपत्र देऊन सोडण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक विजय दौंडकर यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली की, भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या भिंतीजवळ दोघेजण गांजा ओढत आहेत. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत शाबीर आणि जळबा या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 150 रुपयांचा 1 ग्रॅम गांजा आणि 50 रुपयांचे गांजा ओढण्याचे साहित्य जप्त करत गुन्हा दाखल केला. आरोपींना समजपत्र देऊन सोडण्यात आले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.