Wakad Crime News : झाडू खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन ग्राहकांनी काऊंटर मधून 22 हजारांची रोकड पळवली

एमपीसी न्यूज – झाडू खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन ग्राहकांनी दुकानदार तरुणाला झाडू दाखवण्यात व्यस्त ठेऊन दुकानाच्या काऊंटर मधून 22 हजारांची रोकड चोरून नेली. हा प्रकार बेलठीकानगर, थेरगाव येथे गणेश व्हरायटी या दुकानात बुधवारी (दि. 27) दुपारी घडला.

उदयराम पुनाराम चौधरी (वय 23, रा. बेलठीकानगर, थेरगाव) यांनी याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरा वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 380, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांचे बेलठीकानगर येथे कन्हैया पार्क गल्ली येथे गणेश व्हरायटी नावाचे दुकान आहे. बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास दोन अनोळखी इसम चौधरी यांच्या दुकानात झाडू खरेदी करण्याच्या बहाण्याने आले. त्यातील एकाने चौधरी यांना झाडू दाखविण्यात व्यस्त ठेवले आणि दुस-या इसमाने दुकानाच्या काऊंटर मधून 22 हजारांची रोख रक्कम चोरली. त्यानंतर दोन्ही चोरटे झाडू खरेदी न करता निघून गेले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर चौधरी यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.