Career Seminar : व्यावसायिक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी दोन दिवसीय व्यावसाय प्रशिक्षण

प्रशांत कहाणे यांच्या व्यावसायिक प्रशिक्षण प्रबोधिनीचा उपक्रम  - 7057842821

एमपीसी न्यूज – व्यावसायिक होण्याचे स्वप्न उरी बाळगलेल्या अनेकांना व्यावसायिक प्रशिक्षण प्रबोधिनीया संस्थेने प्रशिक्षण देऊन यशस्वी व्यावसायिकतेचा मंत्र दिला आहे. प्रशांत कहाणे यांच्या व्यावसायिक प्रशिक्षण प्रबोधिनीसंस्थेने दोन दिवसीय व्यावसायिक, करिअर व स्व-विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या मुसळवाडी, कडुस, तालुका खेड याठिकाणी हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित आहे. 

यशस्वी व्यावसायिक व्हायचे स्वप्न अनेकजण उराशी बाळगतात. पण, योग्य मार्गदर्शनाअभावी त्यांना आपल्या स्वप्नांना आकार देता येत नाही. अशा तरूणांना व व्यावसायिक क्षेत्रात करिअर करू पाहणा-यांसाठी व्यावसायिकतेचे धडे देण्याचे काम प्रशांत कहाणे यांनी हाती घेतले. 2011 साली त्यांनी ‘व्यावसायिक प्रशिक्षण प्रबोधिनी’ या संस्थेची स्थापना केली. प्रशांत कहाणे स्वत: यशस्वी बांधकाम व्यावसायिक आहेत. गरिबी आणि हालाखीच्या परिस्थितीवर मात करत त्यांनी बांधकाम क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. आपल्यासारखे  व्यावसायिक व उद्योजक निर्माण व्हावेत, असा प्रामाणिक हेतू मनात ठेवून त्यांनी प्रशिक्षण कार्यक्रम दहा वर्षांपूर्वी हाती घेतला.

व्यावसायिक व उद्योजक होऊ इच्छिणा-यांमध्ये आंतरिक बदल घडवणे, प्रोत्साहन देणे व व्यावसायिकता जागृत करणे, माणूस आणि माणुसकीची जाणीव करून देणे, व्यावसायाचा मूळ उद्देश व नव-नवीन संधी सुचवणे तसेच, व्यावसाय संधी उपलब्ध करून देणे हा आमच्या प्रशिक्षणाचा मूळ उद्देश असल्याचे काहाणे यांनी सांगितले. फक्त प्रोत्साहन न देता यशाचे शिखर कसे गाठायचे याचे सविस्तर मार्गदर्शन हाच आमचा हेतू असतो, असे कहाणे यांनी सांगितले.

हे आहेत प्रशिक्षणाचे विषय

सेल्फ डेव्हलपमेंट, करिअर मार्गदर्शन, कौशल्य विकास, योग्य आणि अयोग्य, आर्थिक व्यवस्थापन, व्यावसायिक कल्पना आणि मार्गदर्शन, निर्णय घेण्याची क्षमता व्यावसायासाठी आवश्यक गुण, समस्यांना कसे सामोरे जावे याबाबत मार्गदर्शन तसेच इतर विषयांचे मार्गदर्शन केले जाणार आहे.

व्यावसायिक प्रशिक्षण प्रबोधिनी कोणासाठी

सर्व वयोगटातील महिला व पुरूष, नवीन पदवीधर, होतकरू, व्यावसायिक क्षेत्रात वाटचाल करू पाहणारे, नोकरीच्या शोधात असणारे तसेच नवीन व्यावसायिक

प्रशिक्षक 

– प्रशांत कहाणे – (बीई मेकॅनिकल) (मुख्य प्रशिक्षक)
– सपना होसमथ ( एमबीए) (सह प्रशिक्षक)
– नरेंद्र आवटे ( बी – फार्मसी) (ध्यान आणि आध्यात्मिक प्रशिक्षक)

प्रशिक्षणाचे ठिकाण व वेळ 

– ब्लू बेल अॅग्री टुरिझम रिसॉर्ट, मुसळवाडी, कडुस, तालुका- खेड, जिल्हा – पुणे
– वेळ – शनिवारी (दि. 6, फेब्रुवारी) – सकाळी 9 ते सायंकाळी 7 आणि रविवारी (दि. 7, फेब्रुवारी) सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रशिक्षण कार्यक्रम असेल.

दोन दिवसांच्या या व्यावसाय प्रशिक्षण कार्यक्रमाला 4,000 रूपये एवढे प्रशिक्षण शुल्क आकारले जाणार आहे. यामध्ये दोन दिवसांचे जेवण व राहण्याची सोय मोफत दिली जाणार आहे.

आजपर्यंत संस्थेने अनेक यशस्वी लघुउद्योजक घडविले आहेत. योग्य मार्गदर्शन व वैयक्तिक सल्ला, व्यावसायासाठी आवश्यक गुण व काळजी यासारख्या ब-याच गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवल्या जातात. माणुसकी आणि सामजिक बांधिलकी जपणारी ही संस्था आहे. नवीन पिढीला घडवण्याचे संस्थेचे ध्येय आहे. व्यावसायिक व उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगलेल्या प्रत्येकाने हा प्रशिक्षण कार्यक्रमाला हजेरी लावावी, असे आवाहन प्रशांत कहाणे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क – 7057842821
Blue Bell Farms agri tourism resort
Kadus Dam-Kadus, Tal, Khed, Maharashtra 412404
070578 42821
https://maps.app.goo.gl/EWQ7RANSHDEphD5v7

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.