Bhosari Crime News : चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, आरोपीला अटक 

एमपीसी न्यूज – चारचाकीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी चारचाकीच्या  चालकाला अटक करण्यात आली आहे. गणेश नगर, टेल्को रोड, एमआयडीसी भोसरी या ठिकाणी गुरुवारी (दि.27) हा अपघात झाला. 

शंकर करण सोनार (वय 22, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे अपघातात मृत्यू पावलेल्या इसमाचे नाव आहे. तर आकाश शिवलिंग भिसे (वय 23, रा. एमआयडीसी भोसरी) असे अटक आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी मयत इसमाचे वडिल करण जित सोणार यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शंकर सोनार व त्याचा मित्र दुचाकी (केए 48 जे 335) वरुन केएसबी चौकाकडे निघालो होते. यावेळी मागून आलेल्या (एम एच 12 क्यू एफ 3323) या चारचाकी ने दुचाकीला धडक दिली. या धडकेत शंकर सोनार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व त्यांचा मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.