Pimpri – Chinchwad News: जलक्षेत्रातील तांत्रिकतेबाबत आग्रही भूमिका धरणारे तरूण हवेत – उपेंद्रदादा धोंडे

एमपीसी न्यूज – पर्यावरण क्षेत्रात वृक्ष संवर्धन, गड-किल्ले स्वच्छता, जल प्रदूषण इत्यादी विविध विषयांवर सातत्यपूर्ण कार्यरत असणाऱ्या ‘भूगोल फाऊंडेशन’ तर्फे पिंपरी-चिंचवड येथे ‘विश्व प्रकृती दिवस’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  कार्यक्रमप्रसंगी जलशक्ती मंत्रालयाच्या केंद्रीय भूजल विभागातील वरिष्ठ भूजलवैज्ञानिक उपेंद्रदादा धोंडे यांनी जागतिक हवामान बदल आणि स्थानिक पातळीवरील जल समस्या यांचा संबंध दर्शवणारा लेखाजोखा मांडला.

यावेळी बोलताना धोंडे म्हणाले, “जागतिकीकरणाच्या परिक्षेपात आपण साधारण नागरिक म्हणून काय करू शकतो याचा विचार करण्याची गरज आहे. पिंपरी – चिंचवड परिसरातल्या अनिर्बंध वृक्षकत्तली विरोधात आवाज उठवणारे प्रशांत राऊळ यांचे उदाहरण देत आज अशाच परखड भुमिका घेणाऱ्या तरुणांची गरज आहे.”

“दुष्काळ आणि महापूरानं महाराष्ट्रातील शेतकरी बांधव त्रस्त आहे, प्रशासन जी काही नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करते त्यामुळे शेतकरी बांधवांच्या वेदना संपणार नाहीत, यासाठी दूरदृष्टीचे धोरण गरजेचे आहे. नैसर्गिक आपत्तीचे खापर नियतीवर फोडण्यात अर्थ नाही, जागतिक हवामान बदलासारख्या मुद्द्यावर सामान्य नागरिक म्हणून मी काय करणार अशी हतबलता कामाची नाही”, असे धोंडे यांनी मत व्यक्त केले.

उपेंद्रदादा धोंडे पुढे म्हणाले, आज अनेकजण वृक्षलागवड, जल संधारण, प्रदूषण निर्मूलन इत्यादी वेगवेगळ्या मुद्द्यांवर काम करताहेत, प्रत्येकानं हातभार लावला तरच हे ओझे आपण सहजच उचलता येऊ शकेल. सहज जलबोध अभियान माध्यमातून निसर्ग रक्षक निर्माणाचे काम सुरू आहे, त्यामुळे हि तरूणाईच भविष्याची आशा आहे.

या कार्यक्रमासाठी सूत्र संचालन भूगोल फाऊंडेशनचे विठ्ठल नाना वाळूंज यांनी केले तसेच यावेळी निसर्गराजा मित्र जिवांचे संस्था प्रतिनिधी म्हणून राहूल घोलप, उत्तर महाराष्ट्र जल परिषदेचे भिला पाटील, पिंपरी चिंचवड परिसरातील धडाडीचे निसर्ग रक्षक प्रशांत राऊळ,सायन्स पार्कचे सूनील पोटे, जुन्नर तालुका मित्र मंडळाचे अण्णा मटाले उपस्थित होते.

तसेच दिपक सोनवणे व साहेबराव गावडे, कर्नल तानाजी अरबुज, शशिकांत वाडत,राजेंद्र ठाकूर, चंद्रकांत थोरात, राजेश किबिले, नेताजी पाटील अनिल घाडगे,मनोज माकोडे, सुनील बांगर, सुनील काटकर, अरविंद देवकर,राजेश डहाके,एकनाथ फटांगडे, अजिंक्य पोटे असे इतर अनेक भूगोल फाऊंडेशनचे पदाधिकारी-सदस्य आणि ज्योती दर्ंदळे,शोभा फटांगडे, शिला इचके, मिना आखाडे,भारती डहाके अशी मोठ्या प्रमाणावर महिला वर्गाची सुद्धा उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी अविनाश खोसे यांनी सर्वांचे आभार मानत सांगता केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.