Vikas Dube Arrested: कानपूरमध्ये 8 पोलिसांचे हत्याकांड घडवणारा कुख्यात गुंड विकास दुबेला अटक

Vikas Dubey the main accused in Kanpur Encounter case has been arrested in Ujjain त्याच्यावर 5 लाखांचे बक्षीसही ठेवण्यात आले होते. अखेर त्याला आज (दि.9) सकाळच्या सुमारास उज्जैन येथून अटक करण्यात आले.

एमपीसी न्यूज- कानपूर येथे आठ पोलिसांचे हत्याकांड घडवणारा कुख्यात गुंड विकास दुबेला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. विकास दुबेला मध्य प्रदेशमधील उज्जैन येथून अटक करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात विकास दुबेला अटक करण्यास गेल्यानंतर त्याच्या गुंडांनी पोलीस उपअधीक्षकासह 8 पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या केली होती. तेव्हापासून उत्तर प्रदेश पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याच्यावर 5 लाखांचे बक्षीसही ठेवण्यात आले होते. अखेर त्याला आज (दि.9) सकाळच्या सुमारास उज्जैन येथून अटक करण्यात आले.

विकास दुबे सातत्याने पोलिसांना चकमा देत होता. त्याने महाकाल मंदिरात सुरक्षा रक्षकांना आपली ओळख सांगितली आणि नंतर पोलिसांनी त्याला अटक केली. तत्पूर्वी त्याने त्याने महाकालचे दर्शन घेतले.

उत्तर प्रदेश एसटीएफने शहडोल येथून विकास दुबेचा मुलगा आणि मेव्हण्याला अटक केली. त्यानंतर एसटीएफचे पथक मध्य प्रदेशमध्ये सक्रिय झाले होते. विकास दुबेने स्वतःच महाकाल मंदिरातील सुरक्षा रक्षकांसमोर आपली ओळख उघड केल्याचे सांगण्यात येते.


तत्पूर्वी, विकास दुबेचा आणखी एक साथीदार प्रभात मिश्रा उर्फ कार्तिकेय पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. त्याच्यावर 50 हजार रुपयांचे बक्षीस होते. एसटीएफचे पथक प्रभातला फरिदाबाद येथून ट्रान्जिस्ट रिमांडवर कानपूरला घेऊन जात होते. कानपूरच्या पनकी बायपास जवळ पोलिसांचे वाहन पंक्चर झाले. प्रभातने घटनास्थळावरुन पोलिसांचे पिस्तुल काढून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरु केल्यानंतर त्याने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युतरादाखल केलेल्या गोळीबारात तो ठार झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.