Vadgaon Maval : वडगाव भाजपा, विद्यार्थी आघाडीच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांना पेन व चॉकलेटचे वाटप

एमपीसी न्यूज – दहावीची बोर्डाची परीक्षा मंगळवारी (दि. 15) सुरू झाली. या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मनावरील दडपण कमी करण्यासाठी वडगाव शहर भाजपा आणि विद्यार्थी आघाडीच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांना पेन आणि चॉकलेटचे वाटप करण्यात आले.

मंगळवार (दि 15) रोजी वडगांव मधील  न्यू इंग्लिश स्कूल, अँड ज्युनियर कॉलेज  या ठिकाणी दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा कोरोना महामारीच्या मागील दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ऑफ लाईन पध्दतीने सुरू होत असताना सदर परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना, प्रोत्साहनपर, उत्साह वाढविण्यासाठी वडगांव शहर भाजपा विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष प्रज्योत म्हाळसकर यांचे संकल्पेतून पेन व चॉकलेट वाटप करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा  देण्यात आल्या.

याप्रसंगी वडगांव शहर भाजपचे अध्यक्ष अनंता कुडे,माजी अध्यक्ष मनोज ढोरे,गटनेते दिनेश ढोरे, नगरसेवक भूषण मुथा, प्रसाद पिंगळे, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष,शेखर वहिले, जेष्ठ नेते मधुकर वाघवले,प्रमोद म्हाळसकर,रविंद्र म्हाळसकर,युवक अध्यक्ष विनायक भेगडे,  मकरंद बवरे,हरीश दानवे, संतोष म्हाळसकर,अमोल धिडे, संदीप म्हाळसकर,चेतन बाफना,शिवानंद कटणाईक आदिंसह वडगांव शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.