Nigdi Crime News : छातीत चाकू खुपसून जीवे मारण्याचा प्रयत्न, एकाला अटक

एमपीसी न्यूज – छातीत चाकू खुपसून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ओटास्किम, निगडी येथे मंगळवारी (दि.15) सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली.

संतोष बाळु गायकवाड, कार्तिक, शाहिद साजिद शेख, शाहनवाज साजिद शेख (सर्व रा. ओटास्किम, निगडी) यांच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी संतोष बाळु गायकवाड याला अटक करण्यात आली आहे. किसन शंकर पवार (वय 42, रा. ओटास्किम, निगडी) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किसन आणि आरोपी शाहनवाज शेख यांचे साडु पांडुरंग डिकोळे यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. डिकोळे यांना मारहाण झाल्याने त्यांच्या तब्येतेची विचारपूस करण्यासाठी फिर्यादी किसन आपली मुले अमोल आणि सुरज यांच्यासोबत निघाले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना अडवून शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली.

आरोपी शाहनवाज शेख याने फिर्यादी यांचा मुलगा अमोल याच्या छातीच्या मधोमध चाकू खुपसला, व डाव्या बाजुला पोटात खुपसत असताना तो जर्किंगवरून घसरला. यामध्ये अमोल गंभीर जखमी झाला. आरोपींनी आजूबाजूच्या परिसरात दहशत निर्माण केली व तिथून पळून गेले. असे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.