Vadgaon Maval News : शैलेश वहिले यांना ‘वडगाव खेल रत्न पुरस्कार’

वडगाव मावळ – शिवराज रोडवेज यांच्या वतीने व स्वराज्य क्रिकेट क्लबच्या पुढाकाराने शैलेश पोपटराव वहिले यांचा ‘वडगाव खेल रत्न पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. स्वराज्य करंडक 2022 मधील बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये वहिले यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवराज रोडवेजचे युवा उद्योजक मच्छिंद्र गाडे,गणेश वायकर, संपत म्हाळसकर, सागर वारुळे, प्रशांत म्हाळसकर, तुषार वहिले, सुरेश ढोरे, सोपान पाटोळे,अनिल राऊत,राजेंद्र म्हाळसकर, अतुल ढोरे,अंकुश ढोरे, सुरज गायकवाड यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.

मावळ तालुक्यातून आपला सहकारी शैलेश वहिले यांनी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली, स्टिव स्मिथ, प्रविण आम्रे, ॲलन डोनाल्ड, राॅबिन उत्तापा यांच्या सानिध्यात त्यांना आयपीएलमध्ये सराव करण्याची संधी मिळाली असता व परदेशी दौर्‍यात साऊथ आफ्रिका ‘अ’ संघाबरोबर मॅच खेळण्याची संधी मिळाली.

आजवर वहिले यांनी प्रशांत वहिले क्रिकेट क्लबच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंना राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धा खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली व त्यांना औरंगाबाद येथे राज्यस्तरीय श्री छत्रपती संभाजी महाराज समाजभुषण तसेच त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून त्यांची आज पर्यंतची कामगिरी लक्षात घेता त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

पवन दंडेल, नवनाथ भोसले, जया आंबेकर, आकाश वारुळे, सागर देशमुख, अमोल ठोंबरे, लखन आंबेकर, सोनू भोसले, महेश ठोंबरे, शेखर ठोंबरे, भावेश ठोंबरे सर्व खेळाडू व सदस्य यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

सूत्रसंचालन अमोल ठोंबरे यांनी केले व मच्छिंद्रजी गाडे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.