Chakan Crime News : पूर्वी लग्न झाल्याचे गैरसमजातून चारित्र्यावर संशय घेत विवाहित महिलेचा छळ

एमपीसी न्यूज – मंगळसूत्र घातलेला फोटो पाहून पूर्वी लग्न झाले असल्याचा गैरसमज करून घेतला व चारित्र्यावर संशय घेऊन विवाहित महिलेचा मानिसिक व शारिरीक छळ केला. सासरच्या लोकांनी महिलेला मारहाण करून, मारण्याची धमकी दिली तसेच उपाशी पोटी ठेवून क्रुरतेची वागणूक दिली. फेब्रुवारी ते 12 एप्रिल 2022 या कालावधीत चाकण येथे ही घटना घडली.

पिडीत महिलेने याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पती कमलेश खोले, दिर निलेश खोले, त्याची पत्नी, जाऊ (सर्व रा. चाकण) असे चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा मंगळसूत्र घातलेला जुना फोटो पाहून पूर्वी लग्न झाले असल्याचा गैरसमज आरोपींनी करून घेतला. महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा मानिसिक व शारिरीक छळ केला. आरोपींनी महिलेला मारहाण करून, मारण्याची धमकी दिली तसेच उपाशी पोटी ठेवून क्रुरतेची वागणूक दिली. असे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.