Wakad : दोन वाहनचोरांकडून पाच दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज – दोन अल्पवयीन वाहनचोरांकडून वाकड पोलिसांनी एकूण पावणेदोन लाख रुपयांच्या पाच मोटारसायकल जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील चार आणि देहूरोड पोलीस ठाण्यातील एक वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात सुरु असलेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी वाकड पोलिसांनी तीन पथके तयार केली आहेत. ही पथके वाहन चोरी झालेल्या ठिकाणी आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक बाबींच्या आधारे तपास करीत आहेत. एका ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन अल्पवयीन मुले संशयितरित्या वावरत असताना पोलिसांना आढळली. त्याच्यावर संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांची माहिती काढली.

तपास पथकातील पोलीस हवालदार बापूसाहेब धुमाळ आणि पोलीस शिपाई प्रशांत गलबले यांना माहिती मिळाली की, सीसीटीव्ही फुटेज मध्ये संशयितरित्या वावरणारी दोन्ही मुले थेरगाव येथील धनेश्वर पुलावाजळ थांबली आहेत. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी वाकडमधून चार आणि देहूरोडमधून एक दुचाकी चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांकडून सुमारे 1 लाख 72 हजार रुपयांचा दुचाकी जप्त केल्या. त्यामध्ये शाईन, स्कुटी, स्प्लेंडर, पल्सर आणि पॅशन कंपनीच्या दुचाकींचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.