Pune News : मुलाचा सांभाळ करण्याचे वचन देऊन महिलेवर बलात्कार

एमपीसी न्यूज : मुलाचा सांभाळ करण्याचे वचन देऊन एका तीस वर्षीय महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवून ती गर्भवती राहिल्यानंतर लग्नास नकार देणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या हडपसर परिसरात हा प्रकार उघडकीस आला. पीडित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली असून आरोपी सुधीर अर्जुन बंकपल्ली याच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2019 पासून हा प्रकार सुरू होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे हडपसर परिसरातील अमनोरा पार्क सोसायटीत राहतात. फिर्यादी महिलेला एक मुलगा आहे. या मुलाचा वडिलांप्रमाणे सांभाळ करण्याचे वचन देऊन आरोपीने फिर्यादी सोबत शारीरिक. यातून फिर्यादी गर्भवती राहिल्या. फिर्यादीने ही माहिती आरोपीच्या आई-वडिलांना दिली तेव्हा त्यांनी फिर्यादीला तू तुझा गर्भ पाडून टाकण्यास सांगितले.

तो तुझ्यासोबत लग्न करणार नाही. असे म्हणून फिर्यादीला ठार मारण्याची धमकी दिली. या सर्व प्रकारानंतर फिर्यादीने पोलिसात धाव घेतली असून तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.