Talegaon Dabhade : दुकानात घुसून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज दुकानात दुकानदार महिलेशी गैरवर्तन (Talegaon Dabhade) केल्याचा धक्कादायक प्रकार तळेगाव दाभाडे येथील यशवंतनगर परिसरात सोमवारी (दि.9) दुपारी घडला.

पोलिसांनी याप्रकऱणी मोहन गंगाधर साळवे (वय 24 रा.तळेगाव दाभाडे) याला अटक केली असून याप्रकरणी पीडितेने सोमवारी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Shirgaon Crime News : दुकानात घुसून हिसकावले महिलेचे मंगळसूत्र

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे किराणा दुकान आहे. त्या दुकानात एकट्या असताना आरोपी दुकानात आला व त्याने फिर्यादीला मला तू कॉलेजमध्ये (Talegaon Dabhade) असल्यापासून आवडतेस म्हणत गैरवर्तन केले. फिर्यादी घाबरून तेथून पळून जात असताना आरोपीने त्यांचा पाठलाग केला व त्यांना अडवून आरोपीने धमकी दिली की, कोणाला सांगितले तर तुला व तुझ्या परिवाराला जिंवत सोडणार नाही. यावरून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.