GST Officer Accepted Bribe : येरवडा GST कार्यालयातील महिला अधिकारी लाच स्वीकारताना रंगेहाथ जाळ्यात

एमपीसी न्यूज – येरवडा येथील जीएसटी कार्यालयात राज्य कर निरीक्षक म्हणून काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला दोन हजार रुपयांची लाच (GST Officer Accepted Bribe) स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. गोठवलेले बँक खाते पुन्हा सुरू करण्यासाठी क्लिअरन्स सर्टिफिकेट देण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. गुरुवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

ज्योत्स्ना रामचंद्र कोरडे (वय 35) असे लाचखोर महिला अधिकार्‍याचे नाव आहे. पुणे लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली. एका 46 वर्षीय व्यक्तीने या प्रकरणी तक्रार दिली होती.

Moreshwar Bhondve : माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांना शिवीगाळ

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी ज्योत्स्ना कोरडे या वस्तू व सेवा कर कार्यालय येथे राज्य कर निरीक्षक म्हणून काम करतात. तक्रारदार यांचे गोठवलेले बँक खाते पुन्हा सुरू करून क्लिअरन्स सर्टिफिकेट देण्यासाठी जोत्स्ना कोरडे यांनी दोन हजार रुपये लाच (GST Officer Accepted Bribe) मागितली होती. परंतु लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदार व्यक्तीने लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार केली होती. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तक्रारीची पडताळणी केली असता कोरडे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचून सूचना कोरडे यांना दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.