Ganja Seller arrested : घरातच ‘गांजा’चे दुकान थाटणाऱ्या बहाद्दराला अटक, 21 किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज – पुण्याच्या सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरातच गांजा विक्रीचे दुकान थाटणार्‍या एका तरुणाला (Ganja Seller arrested) पोलिसांनी अटक केली. या बहाद्दराने घरातच पोत्यात गांजा साठवला होता. त्यानंतर छोट्या छोट्या पुड्या करून तो विकत असल्याचे निष्पन्न झाले. अमली पदार्थविरोधी पथकाने आंबेगाव बुद्रुक परिसरात छापा टाकून ही कारवाई केली.

अमित उर्फ बॉब प्रभाकर कुमावत (वय 32) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाची नाव आहे. त्याच्या फ्लॅटमधून पोलिसांनी दोन पोत्यात ठेवलेला 20 किलो 940 ग्रॅम गांजा, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण चार लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

GST Officer Accepted Bribe : येरवडा GST कार्यालयातील महिला अधिकारी लाच स्वीकारताना रंगेहाथ जाळ्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित कुमावत हा घरातूनच गांजाची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी पथकाने कुमावत याच्या आंबेगाव बुद्रुक परिसरातील फ्लॅटवर छापा टाकला. त्याच्या बेडरूममध्ये पोलिसांना पोत्यात गांजा (Ganja Seller arrested) सापडला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.