Pune : महिला दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्सफूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, वुमेन्स क्लब खराडी, सिंधी समाज पुणे आणि ज्योतिचंद भाईचंद सराफ यांच्या संयुक्त विद्यमाने खराडी येथील वुमेन्स क्लब संचालित रुपी वन क्लिनिक मध्ये  मोफत चष्मा वाटपासह मोफत नेत्रतपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.(Pune) या शिबिराचा 278 महिलांनी लाभ घेतला. तपासणी नंतर  नेत्राचिकित्सक सुनील तलरेजा यांच्या तर्फे चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

 

महिला क्लब खराडी चे सर्व सदस्य अध्यक्षा सीमा तंवर यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत वंचितांना मोफत सेवा देण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. रुपी वन क्लिनिक च्या माध्यमातून आसपासच्या वंचित लोकांना जीवनावश्यक वस्तू, आरोग्य सेवा, सॅनिटरी पॅड्स वाटप, आरोग्यविषयक शिबिरांचे आयोजन असे अनेक उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात.

PCMC : सलग दुस-या दिवशी संप सुरुच, पालिकेचे कामकाज बंद

 

शिबिरास अध्यक्षा सीमा तंवर, सिंधी समाज पुणे चे अध्यक्ष ॲड. हरीश हेमराजानी, सचिव राजेश सहजवाला, ज्योतिचंद भाईचंद सराफ तर्फे मुकुलिका शहा, सुप्रिया कोठाडिया आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिराचे संयोजन डॉ. रिशिका श्रीवास्तव, डॉ रोहिणी वारुंगसे, डॉ सुभद्रा सिन्हा, पर्वथा जयगायगणेश, (Pune) मोनाली सोमाणी, प्रिया सिन्हा, जयाप्रदा बिस्वाल, तरुणा मोदी, संतोष अगरवाल, मधू शर्मा, सोमा श्रीवास्तव, श्वेता सरन, प्रियांका नाडीग, डॉ. जयश्री हांडे, दिव्या नरवाणी, स्मिता काळे, डॉ अनुजा रेड्डी, स्वाती खटके यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.