Karlafata News : कार्लाफाटा येथे उच्च विद्युतदाब तारेचा शॉक लागून तरुण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – कार्ला येथे बिल्डिंग चे रंगकाम करणाऱ्या तरुणाला उच्च विद्युतदाब असेलेल्या तारेचा जबर शॉक लागल्याने तो तरुण गंभीररित्या जखमी झाला असून त्याला त्वरित नजीकच्या  हॉस्पिटल मध्ये  उपचारासाठी नेण्यात आले आहे. बळवंत राठोड (वय-30) असे जखमी तरुणाचे नाव  असून तो मूळचा  लातूरचा रहिवासी आहे. 

सदर घटना कार्ला फाटा येथे बुधवारी दि.06 रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास घडली. प्रत्यक्ष दर्शीच्या सागण्यानुसार संबंधित तरुण हा उच्च विद्युतदाब असलेल्यातारेपासून जवळच असलेल्या  इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर पेंटींगचे काम करत होता. दरम्यान तो काम करत असलेल्या ठिकाणावरून  शिडी  सरकल्याने ती उच्चविद्युत प्रवाह असलेल्या तारेवर आदळली व तरुण गंभीर रित्या भाजला गेला व खाली पडला.

जखमी  तरुणाला त्याच्या साथीदार कामगारांनी जवळच असलेल्या नित्यसेवा हॉस्पिटल मध्ये हलवले. बळवंत राठोड हा स्वतः मुख्य कॉन्ट्रॅक्टर असून तो रंगकामाचे कॉन्ट्रॅक्ट घेत असे.

विजेच्या तारांवर तरुण पडल्याने तार तुटून पडली व वीजप्रवाह खंडित झाला, त्यानंतर महावितरण कर्मचाऱ्यांनी विद्युतप्रवाह पूर्वरत करण्यासाठी तातडीने काम चालू केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.