Pimpri Crime News : लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून एकाने तरुणीला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला असल्याची फिर्याद 27 वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात दिली आहे.

कुणाल चव्हाण (सध्या रा. बृहन महाराष्ट्र कॉमर्स ऑफ कॉलेजचे वसतिगृह, शिवाजीनगर, पुणे. मूळ रा. चोचिंदेगाव, ता. महाड, जि. रायगड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. हा प्रकार 24 ऑगस्ट ते 18 डिसेंबर 2021 या कालावधीत हॉटेल विक्रांत पिंपरी, मोरवाडी सार्वजनिक रोड पिंपरी, हॉटेल रिगल इन पिंपरी, हॉटेल पवित्रा पिंपरीगाव येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून तरुणीला पिंपरी परिसरातील विविध हॉटेलवर नेले. हॉटेलवर नेऊन तरुणीच्या इच्छेविरोधात जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर आरोपीने तरुणीसोबत लग्न करण्यास नकार दिला. तरुणीची फसवणूक केली. महिला पोलीस उपनिरीक्षक बोबडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.