Pimpri News: महापालिकेतील 118 अधिकारी, कर्मचा-यांना बढत्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 118 अधिकारी, कर्मचा-यांना बढत्या देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सह शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, लेखाधिकारी, प्रशासन अधिकारी, भांडारपाल, आरोग्य सहाय्यक, प्रमुख अग्निशमक फायरमन पदावर बढती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी पारित केले आहेत. दरम्यान, कोरोनामुळे यंदाही कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आल्या नाहीत.

पिंपरी महापालिका पद्दोन्नती समितीची 31 मे आणि  14 जून 2021 रोजी बैठका झाल्या. या सभेत सेवा ज्येष्ठतेनुसार बढत्या देण्यात आल्या आहेत. सह शहर अभियंता (स्थापत्य) सतिश इंगळे यांना बढती देण्यात आली आहे. समाजविकास अधिकारी 1, ग्रंथालय प्रमुख 1, क्रीडा पर्यवेक्षक 3, सुरक्षा सुपरवायझर 8, लेखाधिकारी 5, , कार्यकारी अभियंता वाहतूक नियोजन 1, विद्युत 1, उपअभियंता 10, कनिष्ठ अभियंता 3, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी  3, ग्रंथपाल 1, गाळनी निरीक्षक 1,  ‘नर्स मिडवाईफ’ 3, भांडारपालपदावर  8 जणांना पदोन्नती दिली आहे.

प्रमुख अग्निशामक विमोचक (फायरमन) 4, प्रशासकीय अधिकारी 4, कार्यालयीन अधिक्षक 16, सुरक्षा पर्यवेक्षक 13, कार्यकारी अभियंता 5, आरोग्य सहाय्यक पदावर 26 जणांना पदोन्नती देण्यात आली आहे. दरम्यान,  महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्यासंदर्भात 2015 मध्ये धोरण निश्चित करण्यात आले आहे.  दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात अधिकारी कर्मचा-यांच्या बदल्या केल्या जातात. परंतु, कोरोना परिस्थितीमुळे मागील दोन वर्षांपासून बदल्या केल्या नाहीत. यंदाही बदल्या केल्या नसल्याचे प्रशासन विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.