India Corona Update : देशात गेल्या 24 तासांत 13,823 नवे रुग्ण, 162 मृत्यू 

एमपीसी न्यूज : देशात मागील 24 तासांत 13 हजार 823 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, 162 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण वाढ घटल्याने देशातील सक्रिय रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा कमी झाली आहे. 

देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 05 लाख 95 हजार 660 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 02 लाख 45 हजार 741 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या देशात 1 लाख 97 हजार 201 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 18 कोटी 85 लाख 66 हजार 947 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 7 लाख 64 हजार 120 नमून्यांची तपासणी मंगळवारी (दि.19) करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात 16 हजार 988 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट रिकव्हरी रेट 96.69 टक्के एवढा आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 162 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 52 हजार 718 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.44 टक्के एवढा आहे‌.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.