India Corona Update : गेल्या 24 तासांत देशभरात 14,849 नवे रुग्ण, 155 मृत्यू 

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत 14 हजार 849 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, 155 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 06 लाख 54 हजार 533 एवढी झाली आहे. सध्या देशात 1 लाख 84 हजार 408 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

 

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 19 कोटी 17 लाख 66 हजार 871 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 7 लाख 81 हजार 752 नमून्यांची तपासणी शनिवारी (दि.23) करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात 155 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 53 हजार 339 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.44 टक्के एवढा आहे‌.

गेल्या 24 तासांत देशभरात 14 हजार 849 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, देशाचा रिकव्हरी रेट 96.81 टक्के एवढा झाला आहे. देशात आतापर्यंत 15 लाख 82 हजार 201 जणांचे लसीकरण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.