Chakan News : खेड मध्ये 31 नवे कोरोना रुग्ण ; 39 डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : खेड तालुक्यात शनिवारी  (दि. 7 ऑगस्ट) 12 गावे आणि 3 पालिकांमध्ये 31 रुग्ण मिळून आले आहेत. खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 33 हजार 634 झाला आहे. यापैकी 32 हजार 961 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. शनिवारी दिवसभरात 39 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्य स्थितीत 192 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत.

खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा 481 एवढा झाला आहे.  सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 24 रुग्ण, चाकण 1, आळंदी 5, राजगुरुनगर 1असे एकुण 31 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.

खेड तालुक्यात शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे-
चांडोली , चिंचोशी ,कडूस, केळगाव,पाईट , शिंदे या गावांमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण मिळाला आहे.  खराबवाडी  व महाळुंगे मध्ये प्रत्येकी 2 रुग्ण ,चऱ्होली खु. मध्ये 3 रुग्ण, कुरुळी, सिद्धेगव्हाण आणि वडगाव घेनंद मध्ये प्रत्येकी 5 रुग्ण असे ग्रामीण भागात रुग्ण मिळून आले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.