Chakan News : हातभट्टीवर छापा ; 10 लाखांचे रसायन उध्वस्त

मोई मध्ये महाळुंगे पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज : महाळुंगे पोलिसांनी हातभट्टयांवर धडक कारवाई करीत खेड तालुक्यातील मोई ( ता.खेड, जि. पुणे ) येथे सारंग बाबा मंदिरा जवळ परीसरातील हातभट्टी उध्वस्त केली. 10 लाख 24 हजार रूपयांचा गावठी हातभट्टी दारूचा कच्चा माल पोलिसांनी या कारवाई मध्ये उध्वस्त केला. पोलीस येण्याची चाहूल लागताच हातभट्टी चालक झाडाझुडपांच्या आडून पसार झाला.

या बाबत महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिलेल्या माहिती नुसार, गुप्त बतमीदाराकडून बातमी मिळाली की, मोई ( ता.खेड) येथे सारंग बाबा मंदिरा जवळ, ओढ्याच्या बाजूला सुखदेव राठोड ( रा.मोई ) याने गावठी हातभट्टी दारू तयार करण्या करिता जमिनी मध्ये खड्डे बनवून त्यामध्ये कच्चे रसायनाचा साठा व दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य बाळगले आहे. दोन पंच व  महाळुंगे पोलीस चौकीचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सदर ठिकाणी जाऊन शुक्रवारी (दि. 6 ऑगस्ट ) छापा मारण्यात आला.

सदर कारवाई मध्ये 10 लाख रुपये किमतीचे 20 हजार लिटर कच्चे रसायन, 10 हजार रुपये किंमतीची लोखंडी टाकी, 4 हजार रुपयांचे काळ्या रंगाचे कँन,  10 हजार रुपयांचे रसायन असा एकूण 10 लाख 24 हजार रुपयांचा माल जेसीबी च्या सहाय्याने जागीच नष्ट करण्यात आला. घटनास्थळावरून सुखदेव राठोड हा पोलिसांच्या येण्याची चाहूल लागताच झाडा झुडपातून पळून गेला. राठोड याच्या विरुद्ध मुंबई दारू बंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.