Pune News : सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राचे ‘पुणे कनेक्शन’, पुण्याच्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमधून घेतले प्रशिक्षण

एमपीसी न्यूज – टोकिओ ऑलम्पिक स्पर्धेत नीरज चोप्रा याने भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावत देशाची मान जगभरात उंचावली. नीरज चोप्राच्या यशात पुण्याचा देखील वाटा मोठा आहे. नीरज चोप्रा यांनी पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमधून भालाफेकीचे प्रशिक्षण घेतले आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे.एस. नैन यांनी अभिनंदन केले आहे.

निरज चोप्रा हे भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचे सुभेदार आहेत. 26 ऑगस्ट 2016 साली, नायब सुभेदार पदावर भारतीय लष्करात ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर म्हणून ते रुजू झाले . आज ऑलिम्पिक स्पर्धेत 87.58 मीटर भालाफेक करत, ट्रॅक अँड फिल्ड सुवर्णपदक जिंकत त्यांनी नवा इतिहास रचला आहे. नीरज चोप्रा यांनी आपले प्रशिक्षण पुण्याच्या आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटमध्ये घेतले आहे.

सुभेदार नीरज मूळचे हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातल्या खांदरा गावातल्या शेतकरी कुटुंबातले आहे. नीरजला 2018 साली अर्जुन पुरस्कार आणि 2021 साली त्यांच्या नेत्रदीपक कामगिरीसाठी विशिष्ट सेवा पदकाने गौरवण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.