Pimpri : पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज – दोन शेजा-यांची किरकोळ कारणावरून भांडणे झाली. यातून एकाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून दुस-या शेजा-याने त्यांच्या आठ साथीदारांसह तक्रार देणा-या शेजा-याला कोयत्याने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 5) रात्री रामनगर, चिंचवड येथे घडली.

सचिन अंकुश कुसाळकर (वय 38, रा. रामनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कृष्णा देवकर, पवन लष्करे आणि त्यांच्या आठ साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन आणि आरोपी एकाच गल्लीत राहतात. त्यांचे किरकोळ कारणांवरून भांडण झाले. याची सचिन यांनी पोलिसात तक्रार दिली. सचिन यांनी पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून आरोपींनी सचिन यांना पुन्हा लाकडी दांडक्याने मारहाण केली.

तसेच सचिन यांचा भाऊ नवीन भोसले यांना कोयत्याने मारले. यामध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. आरोपीच्या साथीदारांनी सचिन यांच्या मावस भाऊ राहुल वेताळे याला पेव्हर ब्लॉकने मारले. यामध्ये तिघेही जखमी झाले. याबाबत पुन्हा पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.