Mumbai : लॉकडाऊन 15 एप्रिलपर्यंत शिथील होईल असे गृहीत धरू नका – राजेश टोपे

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे 15 एप्रिलनंतर लॉकडाऊन 100 टक्के शिथील होईल असं कुणीही गृहीत धरु नये. लॉकडाऊनबाबतची निर्णय प्रक्रिया 10 एप्रिलनंतर सुरु होईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर अपेक्षेपेक्षा जास्त असून तो पाच टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. अशा परिस्थितीत योग्य खबरदारी घेणे महत्त्वाचं आहे. त्यामुळे लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवला जाऊ शकतो, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.