Kothrud News : मनोहर ओक यांचे वृद्धापकाळाने निधन
एमपीसी न्यूज : कोथरुड येथील रहिवाशी मनोहर महादेव ओक (वय 88) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. बुधवारी (दि.30) रोजी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्यामागे मुलगा, सून, जावई मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.
कोथरूड ज्येष्ठ नागरिक संघ तसेच हास्य क्लबचे मनोहर ओक सक्रिय सभासद होते. सुरुवातीला आयकर विभाग, भारत फोर्ज आणि निवृत्त होताना टाटा मोटर्स येथे त्यांनी नोकरी केली. ध्यानधारणा, योगासने, नामस्मरण आणि प्राणायाम ही त्यांची नियमित जीवनशैली होती. वृद्धापकाळाने बुधवारी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
टाटा मोटर्सचे वरिष्ठ व्यवस्थापक (अॅडमीन) विश्वास ओक यांचे ते वडील होत.